विद्याश्री कॉन्व्हेंटच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता

 







विद्याश्री कॉन्व्हेंटच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि.23/12/2024 रोजी विद्याश्री कॉन्व्हेंटच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्याने झाली.मान्यवर पाहूनयाच्या हस्ते दिप प्रज्ज्वलन करण्यात आले, तसेच विद्यार्थयानी विविध गीतांवर नृत्य प्रस्तुत केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.अपूर्व बसूर, श्री.धनंजय साळवे, गुरुनानक पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.रुमाना शेख, विद्याश्री कॉन्व्हेंटचे हितचिंतक श्री.संजय गुप्ता, पत्रकार श्री.ज्ञानेंद्र आर्य उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली आर्या यांनी केले.

या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. कैलास खंडेलवार सर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेल्या रेड ग्रूपच्या विजेत्याना विद्यार्थ्यांना विजयचषक देवून त्यांचे मनोबल वाढवले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.समीक्षा डोंगरे आणि इयत्ता ९ वीचे विद्यार्थी मीझान शेख, हिमांशू डोंगरे, मानसी बहुरिया, कृती मंडल, खुशबू धोटे यांनी केले.

कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन श्रीमती पूनम नातर यांनी केले.




Post a Comment

0 Comments