मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे तालुकास्तरीय करियर मार्गदर्शन कार्यशाळा
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय करियर मार्गदर्शन कार्यशाळा दिनांक 9 डिसेंबर 2024 ला आयोजित करण्यात आलेली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. असमा खान मॅडम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती विमल रच्चावार मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.लामगे सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर तसेच विषय साधन व्यक्ती म्हणून लीना मॅडम, श्री. अमोल बल्लावार सर जिल्हा समन्वयक व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशक चंद्रपूर, पंकज नरुले सर फाउंडर संकल्प फाउंडेशन गडचिरोली, संतोष पंडित संकल्प फाउंडेशन गडचिरोली, संतोषी सूत्रपवार मॅडम सदस्य संकल्प फाउंडेशन गडचिरोली, श्रीमती आशाताई गभणे मॅडम सदस्य संकल्प फाउंडेशन गडचिरोली उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये श्री. लामगे सर गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर संतोषी सूत्रपवार मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.
श्री. संतोष पंडित सर संकल्प फाउंडेशन गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना ओवर हेड प्रोजेक्टर वर चित्रफिती दाखवून करिअर विषयी मार्गदर्शन केले.
या तालुकास्तरीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये तालुक्यातील शाळा सर्वोदय विद्यालय, जनता विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते त्याचबरोबर आमच्या शाळेतील नववी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचा एकूण 245 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सरिता उंबरे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. पंकज साळवे सर यांनी केले.
0 Comments