डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा - डॉ. मंगेश गुलवाडे
◾डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वानादिना निमित्त महायुती द्वारे आदरांजली अर्पण
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : ६ डिसेंबर २०२४ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा स्मरण करत, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून समता, न्याय, आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या संदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी दिलेल्या संविधानिक मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपल्या अनुभवात्मक संदेशात सांगितले की, "बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हाच मंत्र आपल्या जीवनाचा आधार आहे. त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक राहतील." त्यांनी समाजातील सर्वांना शिक्षण, एकता, आणि सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
चंद्रपूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ हजारे, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे, राजू भगत , माजी नगरसेविका छबूताई वैरागडे, भाजपा पदाधिकारी नम्रता ठेमस्कर, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे,राकेश बोमनवार,ज्योतीताई वेलके, रामकुमार आक्कापल्लीवार, प्रवीण उरकुडे, अमित निरंजने, सोहम बुटले यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाला विविध सामाजिक, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे विचार आपल्या आचरणात आणून समतामूलक समाज घडवणे असे प्रतिपादन आपल्या संदेशात प्रख्यात ENT सर्जन व भारतीय जनता पार्टी चे जिल्हा महामंत्री डॉ. मांगेश गुलवाडे यांनी केले.
0 Comments