युवा ग्रामीण पत्रकार संघाचे ६ जानेवारीला नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन

 







युवा ग्रामीण पत्रकार संघाचे ६ जानेवारीला  नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन               

◾राष्ट्रीय अध्यक्ष गणेश  कचकलवार यांची चंद्रपूरात घोषणा                       


    चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज  ) : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच ६ जानेवारी २०२५ ला पत्रकार दिनी   विदर्भातील  नागपूर शहरात युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय स्तरावरील भव्य अधिवेशन  आयोजीत करण्यात आले असून या  संदर्भातील माहिती देण्यासाठी, पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांशी भेटीगाठी घेण्याच्या दृष्टिकोनातून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार हे नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. 

यावेळी त्यांचेसोबत विदर्भ  पदाधिकारी विनोद कन्नाके  होते थे. या भव्य स्वरूपात होणाऱ्या अधिवेशनात राज्यभरातून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृहात  युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या आयोजित बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.   बैठकीत उपस्थित जिलाध्यक्ष सतीश आकुलवार, विदर्भ महिला आघाडी सचिव  जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार, नासिर खान, राहुल गायकवाड, कृष्णा चव्हाण, दीपक बेरशेट्टीवार, बरडे, शेंडे आदी  पदाधिकारी व इतर पत्रकारांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments