तेलंगणा राज्यातील ( मेडारमू समक्का सारक्का देवी ) मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

 









तेलंगणा राज्यातील ( मेडारमू समक्का सारक्का देवी ) मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

◾रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

◾चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; नागरिकांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : तेलंगणा राज्यातील मुलुगु ( मेडारमू समक्का सारक्का देवी ) येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.

 या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.

अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत  सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments