मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

 









मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन


 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : सोमवार दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी  मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर  येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच सर्जनशीलतेचा विकास व्हावा व उद्याचा वैज्ञानिक घडावा या उद्देशाने शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सखीना जव्हेरी मॅडम, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खालीदि मॅडम, पर्यवेक्षिका सौ. विमल रच्चावार मॅडम  यांनी दीप प्रज्वलन करून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व श्रीनिवास रामानुजन यांच्या  प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.



या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सन्मानीय आसमा खलिदी मॅडम मुख्याध्यापिका तसेच विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल तयार करून आणले तसेच सदर मॉडेल चे उत्तमरीत्या सादरीकरण केले. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खलिदी मॅडम विशेष अतिथी म्हणून माननीय सखींना जव्हेरी मॅडम, पर्यवेक्षिका सौ. विमल रच्चावार उपस्थित होत्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी तयार केलेल्या मॉडेल चे कौतुक केले व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

     सदर शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीस आमचे मार्गदर्शक तथा मुख्याध्यापिका माननीय असमा खलिदी मॅडम यांनी भेट देऊन विध्यार्थ्यांना तालुका स्तरावरील प्रदर्शनीसाठी शुभेच्छा दिल्या. या शालेय स्तरावरील प्रदर्शनीचे आयोजन विज्ञान शिक्षिका यांचे मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नाजमी मॅडम व प्रास्ताविक मा.शैलेजा व आभार  हुमा मॅडम यांनी केले. सर्व विज्ञान शिक्षक व इतर शिक्षक गण तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनीं यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.




Post a Comment

0 Comments