अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 







अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : अनोळखी पुरुषाची सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या बाहेरील आवारात तब्येत खराब झाल्याने त्यास सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात भरती करण्यात आले. तसेच पुढील उपचाराकरीता वार्ड क्र.8 मध्ये भरती केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान मृत घोषीत केले. सदर इसमाच्या एम.एल.सी.वरील मौजा किटाळी येथील नमुद पत्त्यावर शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने  मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे

वय अंदाजे 60 वर्ष, उंची 5 फुट, रंग काळा-सावळा, सडपातळ बांधा, केस पांढरे, दाढी मिशी वाढलेली, अंगात पाढंरे काळपट रेषाचा, पाढऱ्या रंगाचा फुल शर्ट, व कमरेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा बरमुडा परीधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर  मृतक अनोळखी  व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके 9767103829, व पोलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे 9511834754 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments