बल्लारपुर तहसील येथे "राष्ट्रिय ग्राहक दिन" साजरा

 






बल्लारपुर तहसील येथे "राष्ट्रिय ग्राहक दिन" साजरा 

"राष्ट्रिय ग्राहक दिन" निमित्त ग्राहक संरक्षण कायदा विषयावर मार्गदर्शन 


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) :  जनसामान्यामध्ये ग्राहक जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ वर्ष २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 

हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत. १) सुरक्षेचा हक्क,२) माहितीचा हक्क,३) निवड करण्याचा अधिकार, ४) म्हणणे मांडण्याचा हक्क, ५) तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क, ६) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार आहेत .

कार्यक्रमाचे  अध्यक्ष मा. महेंद़ फुलझेले नायब तहसीलदार,श्री.अजय मलेलवार नायब तहसीलदार बल्लारपूर यांचे अध्यक्षतेखाली "राष्ट्रिय ग्राहक दिन" मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 11.30 वाजता "राष्ट्रिय ग्राहक दिन" बाबत कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांचे सभागृह ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे  करण्यात आले. 

प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम तंडुलवार जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत चंद्रपूर, आनंद मेरकुरे सचिव ग्राहक पंचायत चंद्रपूर, देवीदास नंदनवार  संघटक ग्राहक पंचायत चंद्रपूर, दिलिप गड्डमवार, सदस्य सुनिल पाचखेडे, किशोर राहुड,श्री.मोरे निरिक्षक वजन मापन, मनोहर दोतपेल्ली कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायदा विषयावर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्तावना प्रजाक्ता सोमुलकर (अन्न पुरवठा अधिकारी ) यांनी केले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन भुमिका मेश्राम यांनी केले कार्यक्रमात समाज सेवक व नागरिक उपस्थित होते.

 



Post a Comment

0 Comments