अल्पसंख्यांक हक्क दिवस
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक 18 /12 /2024 ला अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य सौ. असमा खान खलिदी मॅडम तसेच पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम व कॉलेजच्या इन्चार्ज आमटे मॅडम उपस्थित होत्या. नाजनिन खान मॅडम व शबाना मेहमूद मॅडम यांनी अल्पसंख्यांकाच्या कायदेशीर हक्का संबंधी माहिती दिली वर्ग आठ ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments