चंद्रपुर शहरातील बिनबा चौकातून गांजा जप्त
◾एक अटकेत; चंद्रपूर शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान केली कारवाई
चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहर पोलिसांच्या पथकाने एका युवकास गांजासह अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी दिनांक १५ गस्तीवर असताना ही कारवाई केली आहे. शारिक जलील क्रेशी ( वय ३५ वर्षे, रा.बिनबा चौक, दर्गा वार्ड घुटकाळा चंद्रपूर ) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलिस निरीक्षक राहुल ठेंगणे आणि अन्य पोलिसांचे पथक रविवारी शहरात गस्तीवर होते.
आरोपी कडुन १) लिफाफासह गांजा ९३.०५ ग्रॅम किंमत १००० रू. २) रोख ३,९०० रू. नगदी व क्यु आर कोड स्टॅन्ड ३) एक लाल काळ्या रंगाचा किपेंड मोबाईल कि. ५०० रू. ४) एक लोखंडी सुरा लोखंडी मुठ असलेली लांबी १६.०५ इंच व पात्याची लांबी १०.०१ इंच पात्याची मध्यभागी रूंदी ०२.०६ इंच किंमत १०० रू. ची असा एकुण ५,५०० रू. चा माल मिळून आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गु.र.नं १०२४/२०२४ कलम ८(C), २०(B) IIA, सह क. ४,२५ आर्म अॅक्ट सह क. १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. आरोपी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागिय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्त्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल ठेंगणे, पोलिस उपनिरीक्षक संदिप बच्छिरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, पोलिस हवालदार कपुरचंद खरवार, भावना रामटेके, इम्रान शेख, सचिन राठोड, इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पल्लवी काकडे करीत आहेत.
0 Comments