महावितरणच्या देय रकमेचा अपहार करण्यासाठी बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर

 










महावितरणच्या देय रकमेचा अपहार करण्यासाठी बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर

◾1 कोटी 35 लाख 77 हजार 736 रुपये देय राशी हडपण्याचा प्रयत्न 

◾मुद्रांक विक्रेत्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा

◾विनोद खोब्रागडे यांची पत्रकार परिषदेत मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बनावट व बोगस विवाह नोंदणीची कागदपत्रे सादर करून मयत महिले चे महावितरण चे 1 कोटी 35 लाख 77 हजार 736 रुपये देय राशी हडपण्याचा प्रयत्न करणा_या मुद्रांक व्यावसायिक बबन उराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत केली आहे.

खोब्रागडे यांनी पत्र परिषदेत सांगितले की, त्यांचे जवळचे नातेवाईक रामभाऊ उरकुडा रत्नपारखी हे गुडगावचे रहिवासी असून ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यरत होते. 15 मे 1994 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर अनुकंपापोटी त्यांची पत्नी माला रामभाऊ रत्नपारखी (पारखी) यांची नोकरीवर नियुक्ती झाली. त्यांना मूलबाळ नसल्याने ते बल्लारपुर येथील मुद्रांक विक्रेते बादल उराडे यांच्या घरी भाड्याने राहत होती. माला रत्नपारखी यांचाही 1 मे 2021 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. 

मालाच्या मृत्यूनंतर एमएसईबी कडून देय असलेली 1,35,77,736/- राशी हडप करण्यासाठी त्याने महिलेच्या हतबलतेचा व मानसिकतेचा गैरवापर करून बल्लारपूर येथे राहात असताना बामणी ग्रामपंचायतीचे बनावट व बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार केले. 

ज्यामध्ये 1 जून 2011 रोजी विवाहाची नोंद करण्यात आली आहे. तर नोंदणी 11 जुलै 2013 रोजी दर्शविली आहे. इंग्रजीत 11 जुन 2013 असे लिहिले आहे. 8 फेब्रुवारी 2018 रोजी बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांनी 30 ऑगस्ट 2011 रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून प्रमाणपत्राच्या आधारे बादल हा माला यांचा पती असल्याचे दाखवून न्यायालयाची फसवणूक केली. ही माहिती खोब्रागडे यांना मिळताच त्यांनी बादल उराडे व त्यांचे वकिल एड. जुनारकर वर फौजदारी कारवाई करण्यासाठी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केल्याची माहिती दिली. उराडे यांना महावितरणकडून 1,35,77,736 रुपयांची थकीत रक्कम देऊ नये तथा त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत विनोद खोब्रागडे, बाबा रत्नपारखी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments