प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या मुनगंटीवारांना शुभेच्छा
◾जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांनी घेतली भेट
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईत अनेक जेष्ठ पदाधिकारी आणि आमदारांनी प्रत्यक्ष भेटत शुभेच्छा दिल्या.सोबतच राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील अनेक महत्वाचे नेते, अधिकारी मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देत आहेत. मुंबईतील विशेष अधिवेशन संपल्यानंतर मुनगंटीवार यांचं चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झालं. त्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल विनय गौडा यांनी मुनगंटीवार यांचं अभिनंदनही केलं. गौडा यांच्यासह चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनीही मुनगंटीवार यांची भेट घेतली. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनीही मुनगंटीवार यांचं अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री होते. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडं होतं.
कामाचा अनुभव - चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय काम केलं. शासन आणि प्रशासन यांच्यातील समन्वय यातून दिसून आला. सरकारकडून सोपविण्यात आलेल्या सर्व जबाबदाऱ्या या तीनही अधिकाऱ्यांनी समर्थपणे पूर्ण केल्या. पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी दिवसरात्र एक केले. अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुनगंटीवार यांनी प्रसंगी रात्री-अपरात्रीही धाव घेतली. त्यांच्या कामाच्या वेगाशी प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी आपला वेग जुळवून घेतला.
पालकमंत्री सुधीर मुनंटीवार यांच्या विकासाच्या झंझावात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी व्यापकपणे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावत काम केलं. त्यामुळं चंद्रपूरच्या विकासात सातत्यानं भर पडत गेली. परिणामी सरकारच्या वेगवेगळ्या योजना जिल्ह्यात व्यापकपणे राबविण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.
आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला. आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्यांच्या परिवारालाही तातडीनं आर्थिक मदत मिळाली. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या आधार सिडिंगचं काम तातडीनं पूर्ण झालं. अतिवृष्टी आणि पुरात अडकलेल्या लोकांनाही तातडीनं मदत देणं शक्य झालं. त्यामुळं कामाचा प्रचंड आवाका आणि विकासाचा अखंड ध्यास असलेला लोकनेता आणि कामात तत्पर असेलले अधिकारी, असं चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकाला दिसलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. त्यामुळं पुन्हा हेच समीकरण चंद्रपुरात बघायला मिळणार आहे.
0 Comments