महिलाच बनल्या रेती माफिया
◾वनविकास महामंडळाची बेधडक कार्यवाही सहा ट्रॅक्टर जप्त
◾महिलांनी सुद्धा रेती चोरीचा राबविला नावीन्यपूर्ण उपक्रम
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : दिनांक. 30/12/2024 रोजी पहारे 2:00 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील कक्ष क्र. 26 (A) FDCM च्या जंगलात वनकर्मचारी व अधिकारी गस्तीवर असतांना जंगलातून अवैध्यरित्या रेतीची चोरी करणारे 6 ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली.
घटनेचा पंचनामा करीत चौकशीमध्ये ट्रॅक्टर मालक सौ. शिला रामदास रामटेके, रा. बंदर, अनिरुद्ध देवानंद वासनिक, रा. बंदर, गौतम श्रावण वासनिक, रा. बंदर, सौ. सुनंदा गजानन शंडे, रा. खडसंगी , विशाल संजु मुदलकर, रा.बंदर तसेच वनवास धनराज पाटील, रा. बंदर यांचे मालकीचे हे ट्रॅक्टर आढळून आले असून पाच ट्रॅक्टर जप्त करण्यात आले व एक ट्रॅक्टर पसार झाले आहे.सदरची कारवाई जी. आय. उईके वनपाल , कु. एस. व्हि खोब्रागडे वनरक्षक, वाय. डी.गोटे, एम. टि.पातूरकर , अशोक बावणे, आर.डी.चौधरी यांनी केली असून 'पुढील तपास ए.के.सोनुकर, वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
0 Comments