SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलीअर या वर आयोजीत खुली चर्चा कार्यक्रम

  





SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलीअर या वर आयोजीत खुली चर्चा कार्यक्रम

◾बुध्द पौर्णिमा उत्सव समिती, बल्लारपुर द्वारे आयोजीत


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलीअर या वर आयोजीत खुली चर्चा कार्यक्रम दिनांक 07/11/2024 ला गरुवार सायंकाळी 04.00 वाजता आयोजन स्थळ : एकदंत लॉन, नगर परिषद स्वीमिंग पुल जवळ बल्हारपुर.

आयोजक बुध्द पौर्णिमा उत्सव समिती, बल्लारपुर द्वारे SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलीअर या वर आयोजीत खुली चर्चा  सदर कार्यक्रमात 72 बल्हारपुर विधानसभेतील सर्वपक्षीय उमेदवार यांना पाचारण करण्यात आले आहे. 

माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक 01/08/2024 ला, "SC/ST आरक्षणाचे वर्गीकरण व किमीलीअर " ची अट लावण्यासंदर्भात निर्णय दिलेला आहे. 

चंद्रपूर जिल्हा, वणी, आर्णी क्षेत्राचे खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर आणि विषयाचे अभ्यासक जेष्ठ अधिवक्ता मा. शंकरराव सागोरे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

या पत्रकार परिषदेत बुध्द पौर्णिमा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष रितेश बोरकर, अध्यक्ष विश्वास देशभ्रतार, सचिव आकाशकांत दुर्गे, आनंद वाळके, मुकेश अलोणे, ऍड. पवन मेश्राम, अतुल शेंडे यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments