आमदार जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अम्मा'ला वाहिली आदरांजली
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर असताना, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देऊन आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई उर्फ 'अम्मा' यांना आदरांजली अर्पण केली.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री 'अम्मा का टिफिन' उपक्रमाच्या प्रणेत्या, स्व. गंगूबाई, उर्फ
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महायुती आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. दादमहल येथील कोहिनूर तलावाजवळ त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिलन चौकातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचून अम्मांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी ना. फडणवीस यांनी अम्मा टिफिन उपक्रमची पहाणी करत कौतुक केले.
सामाजिक उपक्रमांतून निराधारांची सेवा करणाऱ्या अम्मांची सेवा राज्यासाठी प्रेरणादायी आहे. आज निराधारांची 'अम्मा' आपल्यात नसली तरी, त्यांनी सुरू केलेले प्रत्येक उपक्रम सेवाभावनेतून पुढे नेला जाईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
0 Comments