अतिक्रमण विरोधात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
◾गदगावला आले पोलिस छावणीचे स्वरूप गावात तणाव
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा उभारला, बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आल्याने इतर समाजाकडून याला विरोध करण्यात येत आहे. ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाला. असुन २८ नोव्हेंबर रोज गुरुवारला पोलिस तथा दंगा नियंत्रण पथकास पाचारण केल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
गदगाव येथील नागरिकांनी 27 नोव्हेंबर ला तहसीलदार श्रीधर राजमाने व पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांना निवेदन सादर केले होते. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता तहसीलदार राजमाने. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी स्वतः गावात भेट दिली. सध्या गावात पोलिस तथा दंगा नियंत्रण पथक तैनात असून गावला छावणीचे स्वरूप आले आहे. गावातील तणावाचे वातावरण बघता पोलीस प्रशासनाने कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0 Comments