काँग्रेसच्या मोटार सायकल रँलीने शहरात सर्वत्र पंजाचे वातावरण निर्माण

 









काँग्रेसच्या मोटार सायकल रँलीने शहरात सर्वत्र पंजाचे वातावरण निर्माण

मूल ( राज्य रिपोर्टर न्युज ) : वारे पंजा-आया पंजा चे नारे देत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी काढलेल्या भव्य मोटार सायकल रॅलीने शहरात सर्वत्र पंजाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

होवू घातलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघामधून  काॅंग्रेस-महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ काल मूल शहरात भव्य रॅली काढण्यांत आली. 

स्थानिक दुर्गा मंदिराचे प्रांगणातून प्रारंभ झालेल्या भव्य रॅलीचा शुभारंभ उमेदवार संतोषसिंह रावत यांनी माॅ दुर्गा देवीचे पुजन आणि जय माता दी ची घोषणा देवुन केली. माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, नगर परिषदेचे माजी सभापती बाबा अझीम, माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, नंदकिशोर कागदेलवार, युवक काॅंग्रेस अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, उपाध्यक्ष संदिप मोहबे, विवेक मुत्यलवार, सुरेश फुलझेले, काजु खोब्रागडे, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडपवार, यांचे नेतृत्वात काढण्यांत आलेल्या मोटार सायकल रॅलीमध्यें तालुक्यातील शेकडो मोटार सायकस्वार युवक आणि महिला सहभागी झालेल्या होत्या. उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या सहचारीणी ममता रावत, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ, मूल तालुका शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राष्ट्रवादी महिला काॅंगे्रसच्या तालुकाध्यक्ष निता गेडाम, शहर अध्यक्ष अर्चना चावरे आदि खुल्या जिप्सीवर उपस्थित होते. दुर्गा मंदिर येथून प्रारंभ झालेली मोटार सायकल रॅली वारे पंजा-आया पंजा च्या घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत कर्मवीर कन्नमवार सभागृहात रॅलीची सांगता झाली. संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ काढण्यांत आलेल्या रॅलीमध्यें सहभागी युवक आणि महिलामधील उत्साहाच्या वातावरणामूळे संपूर्ण शहर पंजामय झाल्याचे दिसून आले. रूपलसिंह रावत, दिपक चुगाणी, अभय चिटलोजवार, चेेतन कामडी, शाम उराडे, गणेश रणदिवे, विष्णु सादमवार, भाग्यवान खोब्रागडे, रणजीत आकुलवार, बालु दुधे, छोटु रावत, डेव्हीड खोब्रागडे, माजी नगरसेवीका लिना फुलझेले, चंदा कामडी, राधीका बुक्कावार, शामला बेलसरे, समता बंसोड, सिमा भसारकर, फरजाना शेख यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. निवडणुक दरम्यान शहरात प्रथमचं काढण्यांत आलेल्या भव्य दिव्य मोटार सायकल रॅलीची शहरात दिवसभर चर्चा झाल्याने शहरातील वातावरण पंजामय झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.




Post a Comment

0 Comments