दिव्यवंदना आधार फाऊंडेशन येथे टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिस साजरा
◾मनोरुग्णांच्या हस्ते कापले वाढदिवसाचे केक
◾टायगर ग्रुप चिमुर चा नावीन्यपूर्ण उपक्रम
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी : आज दिनांक २ नोव्हेंबर २०२४ टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप वर्धा जिल्हा सदस्य सुनिल भाऊ मांगरुडकर टायगर ग्रुप वरोरा तालुका अध्यक्ष रिषभ भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
दिव्यवंदना आधार फाऊंडेशन जामगाव ( को ) येथे टायगर ग्रुप चिमुर तर्फे मनोरुग्ण यांना नास्ता व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित सदस्य टायगर ग्रुप चे विकास जांभुळे, विशाल शेंडे, निखिल गिरी, विशाल शिवरकर, पवन डोंगरवार, पवन झाडे, समिर सोनवाणे, प्रज्वल धारणे, सुरज खडसे, विक्की मोहीनकर, प्रतिक कोसरे, अस्मित हेडाऊ, विशाल आभोरे, शुभम मुंढरे, टायगर ग्रुप चे आदी सदस्य उपस्थित होते.
0 Comments