एसटी व फोर व्हीलर गाडीची धडक - अपघातात नागभीड येथील तहसीलदार गंभीर जखमी
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ),शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर भिसी राष्ट्रीय महामार्गावरील शेता जवळ एसटी बस व फोरव्हीलर गाडीचा झाला अपघात. या अपघातात नागभीड येथील तहसीलदार प्रताप वाघमारे व एसटी बस मधील एक महिला गंभीर झाले. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन (एसटी बस) आडवे झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळित झाली होती. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही बाजूचा मार्ग मोकळा केला.
दिनांक 08/11/2024 ला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास पुरुषोत्तम गणपत खडसे वय -49 वर्षे,धंदा नोकरी (बस ड्रायव्हर )राहणार -उमरेड जिल्हा नागपूर हे चिमूर डेपो येथून उमरडे कडे बस क्रमांक एम एच 40 एन – 8780 ने प्रवासी घेऊन चिमूर – भिसी राष्ट्रीय महामार्गाने जात असताना मुंगले यांचे शेता जवळ अचानक भरधाव वेगाने भिसीकडून चिमूर मार्गे येणाऱ्या I-20 कार क्रमांक MH40 AR - 7756 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील एसटी बसला बाजूंनी धडक दिल्याने बस मधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून फोरव्हीलर मधील नागभीचे तहसीलदार प्रताप वाघमारे गंभीर जखमी झाले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी बसचे नुकसान झाले असता MH40 AR-7756 चे चालकाविरुद्ध भिसी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता,सह कलम 184 मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास PSI चांदे ठाणेदार भिसी यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. शुभांगी पाटील करीत आहे.
0 Comments