बैठकांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा नागरिकांशी थेट संवाद.

 










बैठकांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा नागरिकांशी थेट संवाद. 

◾शहरी आणि ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यात आमदार किशोर जोरगेवार यांनी छोट्या बैठकींकडे लक्ष केंद्रित केले असूनते बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात या बैठकांचे आयोजन केले जात असूनया बैठकींमधून मागील पाच वर्षांतील कामे सांगितली जात आहेत.

  मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहेसर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी मागील आठ दिवसांपासून मतदारसंघात बैठका घेत आपली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या बैठकींमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती असते.

  या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीमागील पाच वर्षांत मोठा निधी आपण मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. चंद्रपूरातील शेवटच्या भागात असलेल्या कृष्णा नगरसंजय नगर या भागांतून आपण विकासकामांना सुरुवात केली. दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील भागांमध्ये विकासासाठी मोठा निधी देण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे.

  पाच वर्षांत अनेक मोठी कामे आपण मार्गी लावू शकलो. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे. धानोरा बॅरेजचा टीपीआर मंजूर करण्यात यश आले असूनत्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी आपण जवळपास ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून जागतिक दर्जाचे काम येथे केले जाणार आहे. वढा तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे. आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून येथील अनेक कामे पूर्ण झाली आहेततर काही कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या बैठकींना नागरिकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या मिलन चौकातील भाजप मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  महानगरपालिकेच्या मागील मिलन चौकात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ मध्यवर्ती निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीसंदर्भातील कामे या कार्यालयातून चालणार आहेत. भाजप नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments