चंद्रपूर शहरात आरोपीकडुन एक देशी कटटा व जिवंत रांउड जप्त

 







चंद्रपूर शहरात आरोपीकडुन एक देशी कटटा व जिवंत रांउड जप्त 

◾चंद्रपुर शहर पोलीसांची चंद्रपूर यांची कार्यवाही


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दि. ०४/११/२०२४ विधानसभा निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी चंद्रपुर शहर येथील अधिकारी सपोनी निलेश वाघमारे व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक इसम लालपेठ रेल्वे स्टेशन वर देसी कट्टा (बंदुक) विक्री करीता घेवुन फिरत आहे. अश्या माहीती वरून पंचा सह लालपेठ रेल्वे स्टेशन येथे गेलो असता एक गुलाबी रंगांची टि-शर्ट ज्यावर पांढ-या रंगाचे लाईन असलेले व काळया रंगाचा लोवर घातलेला मुलगा  पोलीसांना पाहुन पळुन जातांना दिसला त्यामुळे पोलीस स्टॉफचे मदतीने त्यास पकडुन ताब्यात घेतले. 

त्यास ताब्यात घेवुन नाव, गांव विचारले असता त्याने आपले नाव भारत उर्फ मायकल मल्लया गुंपाला, वय ३२ वर्षे, धंदा मजुरी, रा. लालापेठ कॉलरी नं. ०२, चंद्रपूर असे सांगीतले वरून पंचा समक्ष त्याचे ताब्यातुन एक गावठी बनावटीचा देशी कटटा व एक जिवंत बुलेट राउंड किंमत एकुण १२,०००/- रू अशा वस्तु जप्त करण्यात आले आहे.

नमुद आरोपीने विनापरवाना एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कटटा अग्निशस्त्र व एक पितळी धातुची जिवंत बुलेट (रांउड) दारूगोळा असा बाळगला असल्याने त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला असुन सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंध सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती. प्रभावती एकुरके मॅडम, स.पो.नी. पंकज भैसाने यांचे नेतृत्वत गुन्हे शोध पथक प्रमुख स.पो.नी. निलेश वाघमारे, पोउपनी संदीप बंच्छीरे, सफौ महेंद्र, पोहवा सचीन, संतोष कुमार, मपोहवा भावना, नापोका कपुरचंट, पोअ रूपेश पराते, ईर्शाद, शाबाज, विक्रम. खुशाल, रूपेश रणदीवे, ईम्रान, राहुल, दिलीप  यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments