बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी

 




बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी

◾ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी रविवार दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय   अधिकारी कार्यालय, मूल येथे करण्यात येईल.

75 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे बल्लारपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.



Post a Comment

0 Comments