दोन दुचाकींची समोरासमोर धडक; ६ जखमी

 





दोन दुचाकींची समोरासमोर धडक; ६ जखमी

◾नेरी - तळोधी मार्गावरील अडेगाव (को) वळणावरील घटना


चिमूर/नेरी ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : नेरी-तळोधी मार्गावर अडेगाव (को) वळणावर बालू झोडे यांच्या शेतातील मंदिराजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अन्य ५ जण किरकोळ जखमी झाले आहे. हा अपघात दि.२९ सप्टेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला. सर्व जखमींना खासगी वाहनाने तळोधी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर एकाला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. जखमीमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. नेरी-तळोधी मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रविवारी सात बहिणीच्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी उसळते. आज नागपुरातील पर्यटक टेकडीकडे दुचाकी दुचाकी क्रमांक एम एच ४९ बी. एच. ७५६७ ने जात होते. याचवेळी वैजापूर येथील प्रमोद थेरकर (५०), पत्नी रूपा थेरकर (४२) आणि ५ ते ७ वयोगटातील एक मुलगा व एक मुलगी असे चार जण दुचाकी क्रमांक एम. एच. ३४ सी.ए. १७४४ ने सिरपूर येथे भेट देण्यासाठी जात असताना अडे गाव जवळील शिवमंदिराजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. 

या अपघातात दुचाकीचे समोरील चाक तुटून स्फोट झाला. या अपघातात नागपूर येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी असून थेरकर यांचा पाय तसेच मुलीचा हात तुटल्याचे बोलले जात असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिक मदतीला धावून खासगी गाडीने तळोधी येथे उपचारासाठी पाठविले. पुढील तपास पोलीस करित आहे.




Post a Comment

0 Comments