खर्च निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

 



खर्च निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

◾जिल्हास्तरावर जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेडन्यूज, फेकन्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेडन्यूज, फेकन्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे.

या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला खर्च निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खर्च निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांनी स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना दिल्या. सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मिडीया सेंटरमध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments