शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेली जेसीबी मशीन

 



शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेली जेसीबी मशीन

◾डॉ. सतीश वारजूकर यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार 


चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी :  खडसंगी मुरपार सर्कल मधील मौजा खापरी ते मुरपार रिठ पर्यंत पांदन रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद होता, सौ. नानीबाई पांडुरंग धुर्वे राहणार खापरी, गणपत सहदेव खोब्रागडे, राहणार खापरी व शेतकऱ्यांनी तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क साधून तक्रार केली. 

तक्रारीची दखल घेऊन डॉ. सतीश वारजूकर यांना माहिती देण्यात आल्यावरून त्यांनी जेसीबी पाठवून तात्काळ शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे आभार सुद्धा मानले आहे, भिवकुंड येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्या सौ.चंदाताई कारेकार यांनी सदर रस्त्याची पाहणी करून काम करण्याबाबत सुचविले होते. माननीय खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना सुद्धा या रस्त्या पांदन बाबत कळविण्यात आले होते.सदर पांदन रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.शेतकरी संघटनेचे डॉ. हेमंत ईसनकर यांनी सुद्धा या पांदण रस्त्याबाबत खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांच्याशी चर्चा केली होती.




Post a Comment

0 Comments