बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला विरोध नाही,मात्र मूर्तीला इजा पोहचल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहणार

 




बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला विरोध नाही,मात्र मूर्तीला इजा पोहचल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहणार

 ◾पत्रकार परिषदेत आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटीच्या संचालकांनी केले स्पष्ट.. बौद्ध पंच कमेटीचे सुगतकुटीवर आक्रमण

चिमूर  ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व सामाजिक भवनाचे लोकार्पण सुगतकूटी मालेवाडा येथे 1 ऑक्टोबर रोज मंगळवारला होत आहे.याला आम्रवन दिक्षाभूमी सुगतकूटी भिक्कुसंघ संस्थाचा विरोध नाही.

       मात्र प्रतिष्ठापने नंतर भविष्यात बुद्ध मूर्तीला इजा पोहचल्यास किंवा कमी जास्त झाल्यास आम्रवन दिक्षाभूमी सुगतकूटी भिक्खु संघ,संस्था जबाबदार राहणार नाही.

       मात्र,ज्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.ते बेसिक फाउंडेशन गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बनविण्यात आले हाते.

त्या फाउंडेशनला तोड फोड करून आठ फुट उंचीच्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना बांधकाम विभाग करत आहे.त्या मूर्तीला इजा पोहचल्यास किंवा भविष्यात फाऊंडेशन स्लॅपला तडा गेल्यास चिमूरचे बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे सोमवारला विश्रामगृह चिमूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आम्रवन दिक्षाभूमी सुगतकूटी भिक्कुसंघ संस्था मालेवाडाचे संचालक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

         आम्रवन दिक्षाभूमी सुगतकूटी भिक्खू संघ संस्था ही चंद्रपूर धर्मदाय उपआयुक्त येथे नोंदणीकृत आहे. शया संस्थेत एकून अकरा पदाधिकारी संचालक होते.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मृत्यु झाला.

       संस्थेचे सचिव भंते सुगदानंदजी आठ वर्षापासून गैरहजर आहे.अकरा सदस्यापैकी आठ सदस्य हयात आहेत.यापैकी दोन सदस्य संस्थेच्या विरोधात आहे.

       सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बौद्ध बांधवाच्या हितासाठी आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे वर्षभरात सामाजिक सभागृह बांधून तयार झाले.त्याचा दर्जा योग्य नाही.या संदर्भात संस्थेने पिडब्युडीला बांधकामाचे इंस्टीमेट मागीतले असता दिले नाही.

        मात्र स्थानीक लोकप्रतिनीधीच्या दबावात या इमारतीचे लोकार्पण होत आहे.जे दोन सदस्य संस्थेच्या विरोधात आहेत,त्यांनी बौद्ध पंच कमेटीला हाताशी धरून आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे आक्रमन करत कार्यक्रम घेत आहे.

        ज्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ते ठिकाण सामाजिक कार्यकर्ता दिवाकर निकुरे यांनी आम्रवन दिक्षाभूमी परिसरात बोरवेल व 30×30 औरस चौरस आकारात दहा फुट खोल असे बेसिक फाऊंडेशन गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचेविस फुट उंच पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासाठी तयार केले होते.

         टप्या टप्याने काम सुरु होते.मात्र,स्थानिक बौद्ध पंच कमेटी व संस्थेचे दोन सदस्य यांनी आम्रवन सुगतकुटीच्या संचालकांना डावलून बांधलेल्या बेसिक फाउंडेशनची तोड फोड केली. 

      त्यामुळे त्या फाउंडेशन मार बसला त्यांच फांउडेशन स्लॅप वर आठ फुट उंचीची साडे तिनशे क्विंटल वजन असलेली बुद्ध मूर्तीची प्रतीष्ठापणा होणार आहे.त्या बुद्ध मूर्तीला हल्ली किवा भविष्यात इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्थेचा कार्यक्रमास विरोध नाही.

      मात्र आम्रवन दिक्षाभूमी सुगतकूटी सर्वांचीच आहे.ज्यांनी या दिक्षाभूमीला दान दिले त्या सर्वांना बोलवायला पाहिजे होते.     १ ऑक्टोबर मंगळवारला कार्यक्रम होणार आहे असे माहीत झाले असता आम्रवन दिक्षाभूमी संस्थेची परवानगी न घेता कार्यक्रम आयोजीत केला आहे.त्या संबंधाने चिमूर पोलीसात तक्रार करण्यात आली.मात्र पोलीसांनी काहीच केले नाही. 

        बुद्ध मूर्तीला काही झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूरचे अभियंता व मालेवाडा येथील काशीनाथ गजभिये,जगदीश रामटेके व इतर हे जबाबदार राहतील असे आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक यांनी स्पष्ट केले.

          पत्रकार परिषदेला संस्थेचे संचालक वामन वाघमारे,जयदेव शेंडे,कृष्णा खापर्डे,संजय घुटके, विठ्ठल गजभिये,नरेश शेंडे,मनिष गजभिये,मोहन गजभिये,विनोद राऊत आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments