आ.अमित देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करा - व्यंकटराव पनाळे

 



आ.अमित देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करा - व्यंकटराव पनाळे

लातूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक विधानसभेसाठी निवडणुका होत असताना आणि लातूर विधानसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे आमदार अमित देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली असताना आजही दिनांक २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी आमदार अमित देशमुख यांचे जाहिरातीचे मोठे मोठे फलक लागलेले दिसत आहेत. 

हरंगुळ (बु.) गावात हनुमान मंदिराजवळील मुख्य चौकात आणि हरंगुळ गावातून मंदार व रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर रामचंद्र ईगे यांच्या घराजवळ मुख्य रस्त्यावर तसेच हरंगुळ (बु.) गावातून लातूरकडे येणाऱ्या सबस्टेशन वस्तीवरील मुख्य रस्त्यावर आमदार म्हणून काय काम केले हे सांगणारे आमदार अमित देशमुख यांच्या फोटोसह जाहिरातीचे मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत.  

सदरील आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी लावलेल्या पोस्टर चे फोटो आणि व्हिडिओ लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वैशाली ठाकूर घुगे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर, उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देढे यांना व्हाट्सअप द्वारे पाठवण्यात आले आहेत.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी असे जाहिरातीचे मोठे मोठे कटआउट, बॅनर, फलक लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यामुळे आमदार अमित देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी हरंगुळ चे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.




Post a Comment

0 Comments