सोयाबीन पिकाला ६ हजार रुपये प्रती किंटल भाव देण्यात यावा

 





सोयाबीन पिकाला ६ हजार रुपये प्रती किंटल भाव देण्यात यावा 

◾सोयाबीन पिकाला ६ हजार रुपये प्रती किंटल भाव देण्यात यावा याकरीता सौ.प्रिती दिडमुठे यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन


चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ),शार्दुल पचारे प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षापासून सोयाबीन ला ४५०० हजार रुपये प्रती क्विंटल भाव असून गेल्या दहा वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढूनही सोयाबीन पिकाला भाव मिळाले नाही. व सोबाचीन तेलाचे भाव वाढले, यामुळे सर्व शेतकरी वाढत्या महागाई मुळे त्रस्त झाले आहे. या भागामध्ये या वर्षांमध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतमालाचे पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्याऱ्यांनी शेतीमध्ये गुंतविलेले पैसे देखील निघाले नाही.

म्हणुन शेतकऱ्यांच्या मागण्या आहे की, सरासरी ६ हजार रुपये प्रती किंटल सोयाबीन पिकाला भाव देण्यात यावा.याकरीता सौ.प्रिती दिडमुठे उप सरपंच ग्रामपंचायत साठगाव यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी दिगाबर बारसागडे सामाजिक कार्यकर्ता , सौ.अनिता मोहोड , सौ.अनिता चौके ,विलास मोहिनकर तालुका महासचिव काँग्रेस व आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments