‘स्वीप'’अंतर्गत जिल्ह्यात मतदार जनजागृती

 




‘स्वीप'’अंतर्गत जिल्ह्यात मतदार जनजागृती

◾ चित्रकला, निबंध आणि रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व कळावे, मतदानाचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचावा, यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) नुकताच राबविण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागातर्फे निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तिनही स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

            निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी : चंद्रपूर तालुक्यातील 23108 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला. भद्रावती (19452 विद्यार्थी), वरोरा (20440), चिमूर (12756), ब्रम्हपुरी (22723), नागभीड (1868), सिंदेवाही (3432), मूल (10012), सावली (9885), पोंभुर्णा (4256), गोंडपिपरी (2200), बल्लारपूर (15661), राजुरा (12345), कोरपना (9691) आणि जिवती तालुक्यात 2945 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला.

            रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी : चंद्रपूर तालुक्यातील 17328 विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदविला. भद्रावती (18621 विद्यार्थी), वरोरा (15870), चिमूर (7595), ब्रम्हपुरी (16542), नागभीड (1370), सिंदेवाही (3696), मूल (7598), सावली (12456), पोंभुर्णा (3251), गोंडपिपरी (1500), बल्लारपूर (9878), राजुरा (4690), कोरपना (7537) आणि जिवती तालुक्यात 2265 विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला.

            चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी : चंद्रपूर तालुक्यातील 25413 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला. भद्रावती (19657 विद्यार्थी), वरोरा (12570), चिमूर (9362), ब्रम्हपुरी (18932), नागभीड (1720), सिंदेवाही (2872), मूल (9429), सावली (13935), पोंभुर्णा (4127), गोंडपिपरी (2200), बल्लारपूर (14978), राजुरा (3024), कोरपना (10412) आणि जिवती तालुक्यात 2205विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला.

आगामी विधानसभा निवडणुकीत भय व भीतीमुक्त वातावरणात तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश या स्पर्धांच्या माध्यमातून देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.




Post a Comment

0 Comments