तीन आरोपी सहित ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत; बल्लारपूर पोलीसांनी केली घरफोडीचा पर्दाफाश

 




तीन आरोपी सहित ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत; बल्लारपूर पोलीसांनी केली घरफोडीचा पर्दाफाश


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपुर शहरातील किल्ला वॉर्ड येथे १३ सप्टेंबर २०२४ गणेश चतुर्थी चा दिवशी मालन श्रीहरी सातपूते (६९), रा. किल्ला वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांचा घरफोडी चोरी झाली होती, त्यात सोन्याचे दागिने अंदाजे १३९ ग्रॅम, चांदीचे दागिणे २५० ग्रॅम, व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकुण ८ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी झाले होते.

सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान बल्लारपूर पोलीसांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष दर्शी साक्षिदार यांचे बयान व गुप्त माहीती वरून सदर प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला कायदेशीर रित्याप्रमाणे ताब्यात घेवून तपास करण्यात आला व त्या दिशेने तंत्रशुध्द पध्दतीने तपास करून सदर गुन्हयात आरोपी १) सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (२८), रा. सोमनाथपुरा वार्ड, राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपुर, २) दर्शन  अशोक तेलंग, (२३), रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर,३) विकास अजय शर्मा (२५), रा. कमला नगर, वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली यांना अटक करून  तिन्ही आरोपी कडून सोन्याचे दागिणे अंदाजे १३०.२८० ग्रॅम, एकूण किंमत ७ लाख ८३ हजार ४८० रुपये, चांदीचे दागिणे ९६ ग्रॅम एकुण ९ हजार ६०० रुपये, रोख रक्कम २७ हजार रुपये असा एकुण ८ लाख २० हजार ८० रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात सोन्याची ४ चेन, १ मंगळ सूत्र, २ बांगड्या, ४ अंगठी, ३ जोडी कानाचे टॉप्स, २ कानाचे रिंग, १ नथ, १ लॉकेट तर चांदीचे २ पायल, ५ लहान मुलाचे कडा, २ जोड जोडवे, २ बीचवे असे समान हस्तगत केले.

शहरात झालेल्या लाखों रुपयाचा दागिन्यांच्या चोरीचा गुन्हेचा बल्लारपूर पोलीसांनी पर्दाफाश केले असून एका विधी संघर्ष बालक सहित तीन आरोपींना अटक केले आहे. त्यांचा कडून सोने चांदीचे दागिने सहित आठ लाख वीस हजार रुपये चा मुद्देमाल हस्तगत केले आहे.

 बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे अप. क्रं ८८९/२०२४ कलम ३०५ (ए ), ३३१ (३), ३३१(४) (ए) बी एन एस  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, पोलीस उपनिरिक्षक हुसेन शहा, सहाय्यक फौजदार गजानन डोईफोडे, आनंद पारचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वसिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच मपोचा वामन शेंडे, पोउनी चा भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंडार, विना एलकुलवार, इत्याद्दी पो. स्टाफ तसेच सायबर सेल, चंद्रपूर यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.




Post a Comment

0 Comments