गरीब व गरजू मला मुलींना शालेय साहित्य वाटप

 




गरीब व गरजू मला मुलींना शालेय साहित्य वाटप

◾बाल समाज गणेश मंडळ चूनाळा यांचा उपक्रम

राजुरा ( राज्य रिपोर्टर न्युज ), राकेश कलेगुरुवार प्रतिनिधी : राजूरा तालुक्यात दिनांक 11 ऑक्टोबर  2024 रोजी  बाल समाज गणेश मंडळ चुनाळा  मार्फत गावातील अत्यंत गरजू  कुटुंबातील शिकणाऱ्या मुला मुलींना शालेय साहित्य वाटपाचा एक छोटासा उपक्रम राबवण्यात आला. 

गावातील या बाल गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी  समाजाचा विकास व्हावा हा दृष्टिकोन राबवून समाजातील प्रत्येक घटकाचा प्रगती व्हावी यासाठी नेहमी कार्यरत् व प्रयत्नशील असतात. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासकार्य घडवीत असतात. 

गावातील अत्यंत गरीब  कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना विविध प्रकारचे मार्गदर्शन करीत असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुला मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला चुनाळा गावातील ग्रामस्थानी उत्सपूर्त प्रदिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावातील नागरिक व मंडळाचे अध्यक्ष विजय धूर्वे , कोषाध्यक्ष तथा सचिव कमलेश  वांढरे, इंजि. रंजीत डाखरे, वैभव माणूसमारे, शुभम धुर्वे , सुरज धुर्वे, निशांत ब्राह्मणकर, राहुल माणूसमारे, प्रणय कुंभे, कल्पेश माणूसमारे, विकास चिंचोलकर, किशोर खाडे व शंकर माणूसमारे इतर सदस्यांनी सदर उपक्रम राबवून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाबद्दलओढं निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले. बाल समाज गणेश मंडळ मार्फत आयोजित करीत असलेल्या विविध उपक्रमा बद्दल गावकऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.




Post a Comment

0 Comments