पोलीस विभागाने कार्यक्रमाची दिलेली परवानगी राजकीय दबावतंत्रात रद्द होण्याच्या मार्गावर
◾गौतमी पाटील यांचा कार्यक्रम राजकीय वर्तुळात गाजणार
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दूल पचारे प्रतिनिधी : सुप्रसिद्ध नाट्य कलाकार गौतमी पाटील यांचा कार्यक्रम चिमूर शहरात प्रथमच चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिनांक ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
याबाबत संपूर्ण विभागाची रितसर परवानगी सुद्धा ३ दिवसाअगोदर घेण्यात आली असता आज दिनांक ७/१०/२०२४ ला राजकीय वर्तुळात फार मोठे घमासान पेटले असून सध्या चिमूर विधानसभा क्षेत्र हे भाजप आमदार यांच्या आधीपत्यात आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण भारतातील गृहखातं हे भाजप च्या सत्ताधिकारी यांच्याकडे असल्यामुळे राजकीय वर्तुळात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे पडसाद भाजप च्या सत्ताधाऱ्याला कुठेतरी खपत असल्यागत चिमूर विधानसभा क्षेत्रात चर्चासात्र सुरु झाल्याचे चित्र उमटले आहे. बघावे तिकडे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली असून पुढे हा कार्यक्रम होणार अथवा नाही अशी तिळमात्र शंका सर्वत्र विधानसभा क्षेत्रात निर्माण झाली आहे.
0 Comments