४ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली येथून होणार ओबीसींची संवाद सभेची सुरवात

 





४ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली येथून होणार ओबीसींची संवाद सभेची सुरवात

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दि. ४ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी १२ वाजता कात्रटवार कॉम्प्लेक्स   चामोर्शी रोड गडचिरोली येथे  आणि साय शुक्रवारला सांय.6 वाजता जूनी तेलघानी खादी ग्रामोद्योग, गजानन मंदिर जवल गोविंद पुर रोड हॉल,गोंदिया येथे ओबीसींची संवाद सभा आयोजित केली आहे.

 महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयाची माहिती अजून पर्यंत ओबीसी समाजापर्यंत पोहोचली नाही, महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अजूनही ओबीसी विद्यार्थी पालक व बेरोजगारांना माहिती नाही त्यामुळे ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. नुकतेच शासनाने ओबीसी, एनटी , व्हीजे, एसबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी ची उत्पन्न मर्यादेची अट रद्द केली असून फक्त आता नॉन क्रिमिलेअर  प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे परंतु याबाबत सुद्धा बऱ्याच पालकांमध्ये संभ्रम आहे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे निकष कोणते याबाबत सुद्धा पालकांना माहिती नाही, या संवाद सभेच्या माध्यमातून हे सर्व संभ्रम दूर केले जाणार आहे.

 २० सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे ओबीसी, एनटी, व्हीजे,एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रति पूर्ती होणार असून याचा शासकीय/ निमशासकीय कर्मचारी, शिक्षक ,प्राध्यापक तसेच सार्वजनिक उपक्रमातील  बँका, विमा, विद्यापीठ मधील कर्मचारी  यांच्या पाल्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. ही संवाद सभा विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोंबर या कालावधीत गडचिरोली पासून सुरू होऊन  गोंदिया, भंडारा, वर्धा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वणी , चंद्रपूर,चिमूर शेवटी नागपूर येथे समारोप होणार आहे.संवाद सभेचे नेतृत्व  महासचिव सचिन राजूरकर  हे करणार असून, प्रमुख  वक्ता वृषभ राऊत ,  21 दिवस अन्नत्याग करणारे ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, राजू चौधरी आदी संबोधित करणार आहे तरी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी या सभेला न चुकता उपस्थित राहून सभेचा लाभ घ्यावा असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर,  बबलू  कटरे, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजणे,  उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, प्रा. देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, जिल्हा संघटक शंकर चौधरी, चंद्रकांत शिवणकर, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, सचिव रमेश कोठारे, महिला जिल्हाध्यक्ष मंगला कारेकर, सचिव नम्रता कुत्तरमारे, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, सचिव बुधाताई पोरटे इत्यादींनी केले आहे.




Post a Comment

0 Comments