आजपासून भाजपा चे जिल्हा महाजनसंपर्क अभियान
◾अभियान च्या माध्यपासून भाजपा पदाधिकारी पोहचणार मतदारापर्यंत
◾पत्रकार परीषदेत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांची माहीती
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्ह्यातल्या प्रत्येक घरापर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या राज्य सरकार च्या योजनांची माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवार 8 आक्टोबरपासून जिल्हा महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात येत आहे अशी माहीती श्रमिक पत्रकार भवन मध्ये आयेाजित पत्रकार परीषदेत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी दिली.
राज्याचे वन, मत्स्य, सांस्कृतिक तसेच जिल्हयाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार या अभियानात सहभागी होणार आहे. या महाअभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता पोहोचनार आहे. यादरम्यान घर चलो अभियान राबवून पत्रक मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येणार आहे. राज्य सरकार ची लाडकी बहीण योजना, तिर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, पीक विमा योजना, पंतप्रधान आवास योजना, शहरी घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान यादरम्यान करण्यात येणार आहे. योजना संदर्भात लाभार्थ्यांकडून सूचनाही घेण्यात येणार आहे. 1 सप्टेंबपासून भाजपा ने सदस्य बनविने अभियानास सुरूवात केली आहे. तसेच जिल्ह्यात 2000 बुथ तैयार करून बुथ बैठकींच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत शासनाचे कार्य पोहोचविण्यात येणार आहे.
पत्र परीषदेला भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राहुल पावडे, सविता कांबले, किरण बुटले आदि उपस्थित होते.
0 Comments