नगर परिषद बल्लारपूर येथील कर्मचारी आरोग्य विमा निविदेत भ्रष्टाचार




नगर परिषद बल्लारपूर येथील कर्मचारी आरोग्य विमा निविदेत भ्रष्टाचार

◾भ्रष्टाचारात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करा

◾मनसे कामगार नेते जिल्हाध्यक्ष अंधेवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर नगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या  आरोग्य विम्यासाठी सन 2024 - 25 साठी निविदा काढण्यात आली होती. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि इफको टोकियो यांनी ही निविदा भरली होती. नियमानुसार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या निविदा ऑनलाइन मागवणे बंधनकारक आहे असे असतानाही निविदेची रक्कम जास्त असतानाही लेखापालाने ऑफलाइन पद्धतीने निविदा चालवून या प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन गंधेवार यांनी केला आहे. या संदर्भात भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लेखापाल व संबंधित अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, कोणतीही निविदा प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक होण्यासाठी निविदा प्रक्रिया ऑनलाइन करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता ऑफलाइन प्रक्रिया करून निविदा प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करताना प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण माहिती आणि रेट संबंधित बॉक्स भरणे आवश्यक आहे. परंतु स्टार हेल्थ फायनांस इन्शुरन्स कंपनीने लिफाफ्यात दर पत्रकात चार पैकी दोन दर सादर केल्यामुळे हे दरपत्रक अपात्र ठरले आहे. उर्वरित 2 निविदाधारक एचडीएफसी लाईफ आणि इफको टोकियो पात्र असूनही, त्यांना जाणीवपूर्वक अपात्र दाखवून अपात्र असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला निविदा दिल्याची पुष्टी झाली आहे.

प्रक्रियेदरम्यान, निविदाधारकांनी देऊ केलेल्या दरांमध्ये, विशेषत: एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने देऊ केलेल्या दरांमध्ये अनावश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या हिताचे हे टेंडर पास करून या कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी हा भ्रष्टाचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली. यात गोरगरीब कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. या संदर्भात नगरपालिकेच्या लेखापाल यांना आरोग्य विमा वर्ष 2024 - 25 च्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, ती कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती गंधेवार यांनी दिली.

यामध्ये संबंधित लेखापालाने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या निधीचा गैरवापर करून शासनाचे नुकसान केले आहे, निविदा प्रक्रियेच्या दरात फेरफार करून गैरव्यवहार केला आहे, शासनाची दिशाभूल करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे आदी गंभीर गुन्हे करून चौकशीअंती कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मागणी करण्यात आली आहे, अन्यथा मनसे कामगार सेनेतर्फे जनआंदोलन उभारण्याचे संकेत अमन गंधेवार यांनी पत्रपरिषदेत दिले आहेत.

पत्रपरिषदेत अमन गंधेवार, अरुणा तोडसाम, उमेश कोंडले, अजित पांडे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments