मेडीकल कॉलेज मागील झुडपी जंगालामधील जुगार अडयावर कारवाई करून ०७ आरोपीतांना ताब्यात घेतले.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १८/१०/२०२४ रोजी मा. पोलीस अधिक्षक, मुम्मका सुर्दशन सा. यांनी चंद्रपुर शहरात जुगार, प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सामलवार व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, अष्टभुजा वार्ड, मेडीकल कॉलेज मागील झुडपी जंगलामध्ये काही इसम ५२ तास पत्यावर पैश्याची बाजी लावुन कट पत्याचा जुगाराचा खेळ खेळीत आहेत अशा खबरे वरून पंचा समक्ष छापा टाकुन ०७ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचकडुन जुगार साहित्या व नगदी असा एकुण २९,२००/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपीतांना विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे जुगाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/सतिश अवथरे, नापोशि/संतोष येलपुरलवार, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ नरोटे, चापोशि/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
0 Comments