ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकार्यावर विश्वास ठेवत शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय पावडे भाजपमध्ये

 




ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकार्यावर विश्वास ठेवत शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय पावडे भाजपमध्ये

◾पोंभुर्णा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश

◾सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपाचा दुपट्टा घालत ना. मुनगंटीवार यांनी केले स्वागत

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पोंभुर्णा तालुक्यातील नेते संजय पावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी पावडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

संजय पावडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात पोंभूर्णा येथील ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष होते. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांमुळे व सकारात्मक राजकारणामुळे प्रभावित होत आपण भाजपमध्ये प्रवेश घेतला असे पावडे म्हणाले. पावडे यांच्यासह नवेगाव मोरे येथील ग्रामपंचायत सदस्य देवेद्र कष्टी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद बोबडे, साईनाथ पिंपळकर, गजानन मोरे, बापुजी गौरकर, रितिक शेमले, मनोज कोवे, प्रज्वल पावडे, धनराज मोरे, मयूर पावडे, अविनाश कोवे, मनोज पिंपळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हेच आपले ध्येय आहे. सैनिक शाळा, वन अकादमी, देखणी बसस्थानके, ई-लायब्ररी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची देखणी विश्रामगृहे , इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड असे अनेक विकासकामं आपण जिल्ह्याच्या प्रगतीसाठी केली आहेत.

बचत गटांच्या महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही, असा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा तिढा सुटला आहे. धानाला बोनस मिळाला आहे. त्यामुळे यापुढेही चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी कार्य करणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, भाजपचे महामंत्री हरीश ढवस यांची पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments