तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात धनराज मुंगले यांची मागणी

 




तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात धनराज मुंगले यांची मागणी

◾विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने तेली समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मागणी

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ),शार्दूल पचारे प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही तरीही संपूर्ण तैली समाज काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि काँग्रेसचे बहुतांश खासदार संसदेत पोहोचले.

           तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्फत विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने तेली समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळावे या मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय समितीला देण्यात आले आहे. असे मत नुकतेच आयोजीत पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग संघटनचे धनराज मुंगले यांनी माहिती दिली आहे.

            धनराज मुंगले पुढे म्हणाले की, विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे व इतर अधिकारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती अध्यक्ष भानुदास माळी, विदर्भ तेली समाज महासंघाचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस नामदेव हटवार यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.

          तसेच चिमूर विधानसभा मतदारसंघात बहुसंख्य तेली समाज असून ते गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना संधी दिल्यास ते नक्की जिंकेल अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ समितीने व्यक्त केली आहे.

         यावेळी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे संघटक धनराज मुंगले , विदर्भ तेली समाज महासंघाचे चिमूर तहसील अध्यक्ष ईश्वर डुकरे,घनश्याम येनुरकर, सुरेश वंजारी, प्रशांत ढिगरे, दिदेव बनकर, विनायक मुंगळे, दीपक ठोबरे संजय पडोळे आदी उपस्थित होते. पडोळे व तेली समाज महासंघाचे विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments