आज १ ऑक्टोंबर सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा

 





आज १ ऑक्टोंबर सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे प्रथमच बौध्द पंचकमेटी, भिमज्योती महिला मंडळाच्या माध्यमातून गगन मलिक फाॅऊंडेशन व भांगडीया फाॅऊंडेशन यांच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबरला सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यकामाची तयारी अंतिम टप्प्यात असून या कार्यक्रमात सुमारे दहा हजाराचे वर बौद्ध उपासकासह नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे यांनी सुगतकुटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

थायलंड देशातुन दान स्वरूपात प्राप्त ८ फुट व ५ फुट उंच असलेला बुध्दरुपाचे प्रतिष्ठापना व महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे निधीतुन बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळयाकरीता विशेष अतिथी म्हणुन थायलंडचे कॅप्टन नटूट्टाकिट चाईचेलर्ममॉन्गखील व गगन मलिक फाऊन्डेशनचे अध्यक्ष,डॉ. गगन मलिक, चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया उपस्थित राहणार असुन यावेळी थायलंडचे द मोस्ट व्हेन, फ्रा. देवपणा अधीन, संघारामगिरीचे भिक्खु ज्ञानज्योती महास्थविर, सुगतकुटी मालेवाडाचे सचिव भिक्खु सुगतानंद महाथेरो , थायलंडचे फ्रामाहा बॅनजाँग आर्थिजवांग्या, डॉ. फ्रामाहा सुकारीक सुभटदरी, डॉ. भिक्खु धम्मचेती, मालेवाडाचे सरपंच कालीदास भोयर, जितेंद्र मोटघरे, पोलीस पाटील हेमंतकुमार गजभीये, बौध्द पंच कमेटी अध्यक्ष मालेवाडाचे जगदीश रामटेके, उपसरपंच शंकर दडमल, लोहाराच्या सरपंच दिक्षा पाटील, जि. प. माजी सदस्य मनोज मामीडवार, ईश्वर मेश्राम, ओम खैरे, काशिनाथ गजभीये, यशवंत सरदार, प्रविण जिवतोडे, गगन मलिक फाऊन्डेशनचे पी. एस. खोब्रागडे, डॉ. मोहन वाकडे, विकास तायडे, विनयबोधी डोंगरे, अनिरुध्द दुपारे, अमित वाघमारे, विशाल कांबळे, वर्षा मेश्राम, गुणवंत सोनटक्के आदी उपस्थित राहणार आहेत.

१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता पासुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन यात प्रसिध्द गायक अनिवृद्ध वनकर, कडुबाई खरात, व संच यांचा बुध्द-भिम गितांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला जितेंद्र मोटघरे यांचेसोबत जगदिश रामटेके, काशिनाथ गजभिये, यशवंत सरदार, लीलाधर बन्सोड, शैलेंद्र पाटील, सावन गाडगे, सागर भागवतकर, सतीश वानखेडे, पराग अंबादे, अमर गाडगे, शैलेश ठवरे, अशोक मेश्राम, ईश्वर ठवरे, वामन गजभिये, रोशन बोरकर, पत्रुजी गजभिये, राकेश मेश्राम, नरेश गजभिये आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments