अवैद्य दारू वाहन सहीत एकूण 5,88,240/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
◾स्थानिक गुन्हे शाखेची अवैद्य दारू वाहनांमध्ये वाहतूक करणारे विरुद्ध कारवाई
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 23/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एका टाटा येस zenon मालवाहू गाडी मधे अवैध्यरित्या दारु वाहणामधे टाकून विक्री करिता नेत आहे. अशी खात्रीशीर माहीतीवरुन नागपूर कडून चंद्रपूर कडे येणाऱ्या रोड वर वरोरा नाका जवड नाकाबंदी केली असता टाटा येस झेन वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यामधे कप्पा तयार करून त्यामधे लपून देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 2000 नीपां किंमत 70000/- रू. व विदेशीं दारू 180Ml 96 निपा किंमत 18280/- रू. चां तसेच टाटा zenon मालवाहू गाडी किंमत 5,00,000/- रू. माल असा एकूण 5,88,240/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.
आरोपी विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक /2024 कलम 65 अ (ई ),83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यवाही पथक Dysp प्रमोद चौगुले, पो. नि. कोंडावार,सपोनी दीपक कांक्रेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पो. हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे , प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर.
0 Comments