चिमूर शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समिती द्वारा आयोजित दहीहंडी स्पर्धेचे कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न










चिमूर शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समिती द्वारा आयोजित दहीहंडी स्पर्धेचे कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न 



चिमूर ( राज्य रिपोर्टर न्यूज),शार्दुल पचारे प्रतिनिधी :  दिनांक.०४/०९/२०२४ बुधवार ला चिमूर येथील चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दहीहंडी उत्सवात विदर्भातील एकूण १३ गोविंदा ग्रूप सहभागी झाले होते. या कार्यक्रमा प्रसंगी शिवानी वाडेट्टीवर यांनी पदवीधर व पदव्यूत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यईल अशी घोषणा केली. तर संदीप कावरे यांनी बेरोजगारी बघता चिमूर शहरात रोजगार उपलब्धी संदर्भात माझे प्रयत्न सुरु आहे आणि ते मी एके दिवशी उपलब्ध करून दाखवेल अशी घोषणा केली. तर मला दहीहंडी स्पर्धा घेण्यासाठी कुणीही अडवू शकणार नाही मी दरवर्षी हा कार्यक्रम घेत राहणार असेही मत यावेळी व्यक्त केले.तर धनराज मुंगले यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकास हा १० वर्षे मागे गेला असून जनतेला फक्त गिफ्ट वाटून आकर्षित करणे हे योग्य नव्हे तर जनतेच्या हाताला रोजगार मिळायला हवा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित केलेल्या या भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या व आलेल्या सर्व १३ हि गोविंदा ग्रुपचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कार्य केले.यामध्ये पहिले बक्षीस जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांना मिळाले तर दुसरे बक्षीस आदिशक्ती ग्रुप भंडारा आणि तिसरे बक्षीस शिवशाही गर्ल्स ग्रुप राजुरा यांना मिळाले. 

बक्षीसमद्धे प्रथम पारितोषिक १ लाख १ रुपये श्रीमती कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार तर दुसरे पारितोषिक ५१ हजार १ रुपये शिवानीताई विजय वडेट्टीवार महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि तिसरे पारितोषिक २१ हजार १ रुपये धनराज मुंगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक यांच्या कडून देण्यात आले. या दहीहंडी कार्यक्रम उत्सव कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कु. शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी , सतीश वारजूकर चिमूर - ७४ विधानसभा समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, गजानन बुटके सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर, संदीप कावरे माजी अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस चिमूर, राजू लोणारे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी, प्रदीप तळवेकर अध्यक्ष ओबीसी काँग्रेस चिमूर तथा पर्यावरण विभाग, गौतम पाटील महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी युवक, नागेंद्र चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस तालुका, विलास मोहिनकर तालुका सरचिटणीस काँग्रेस कमिटी,साईश वारजूकर सरपंच शंकरपूर, नितीन कटारे माजी नगर सेवक, पलाश वारजूकर ,शंकर माहुरे, राजू नन्नावरे, राजू दांडेकर, डॉ. किन्नाके माजी वैधकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर ,ताहीर शेख,अक्षय नागरीकर, इशांत मामीडवार शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, रोहन नन्नावरे महासचिव जिल्हा युवक काँग्रेस, सारंग मामिडवार, अमित सातपुते, सुभाष मोहिनकर तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments