ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर ची राज्यस्तरावर भरारी

 



ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर ची राज्यस्तरावर भरारी

◾जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा आयोजित 

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये ग्रामगीता कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर नाटक व नृत्य कला प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचे व चिमूर तालुक्याचे नाव उंचावले. नृत्य कलाप्रकारात श्रुती कोयचाडे, सानिया चौधरी, स्नेहा खोंडे, भूमिका नन्नावरे, समीक्षा कुमरे तसेच नाटक कलाप्रकारात दर्शन पेंदोर, जानवी पाटील, अनुष्का मेश्राम, साक्षी सावसाकडे, मुस्कान वारके या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. आनंदे सर, तसेच प्राध्यापक निकेश कुनघाटकर सर, प्राध्यापक सचिन भरडे सर, सूरज देशकर, गौरव मेश्राम, कुलदीप पिंपळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.




Post a Comment

0 Comments