बल्लारपूर पोलिसांची बिना नंबर प्लेट दुचाकीवर कारवाई

 





बल्लारपूर पोलिसांची बिना नंबर प्लेट दुचाकीवर कारवाई

◾१७ दुचाकी वर दंडात्मक कारवाई करत ८,५०० रुपये वसुली

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर पोलीसांनी आज बिना नंबर प्लेट दुचाकीवर वर धडक कारवाई केले.

         शहरात होत असलेल्या दुचाकी चोरी वर अंकुश ठेवण्याकरिता आज पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीसांनी बिना नंबर प्लेट दुचाकीवर विशेष मोहीम राबवून १७ दुचाकी वर दंडात्मक कारवाई करत ८,५०० रुपये वसुली केले.

      सदर विशेष मोहीम पोलीस निरीक्षक यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन डोईफोडे, पोहवा गजानन झाडे, पोहवा अजय खरकाटे, पोषि राहुल धिडसे, पोशी शाहरुख खान, पोशी प्रणय वानखेडे, पोशी स्वप्नील खोब्रागडे, पोशी गणेश पुरटकर यांनी केले.




Post a Comment

0 Comments