'हास्या'चा धक्कादायक मृत्यू




'हास्या'चा धक्कादायक मृत्यू

◾चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांची ती मुलगी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : येथील अग्रेसन भवन परिसरामध्ये राहणाऱ्या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांची जेष्ठ कन्या हास्स्या विघ्नेश्वर ( २० ) वर्षीय तरुणीचा रविवारी सकाळी १२:३० वाजताच्या सुमारास धक्कादायक मृत्यू झाला.

काल २२ सप्टेंबर ला दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. दुपारी १२ वाजता हास्स्या कथ्थक नृत्याचा वर्ग आटोपल्यानंतर घरी आली. काही वेळाने तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या या आकस्मिक व अकाली मृत्यूने विघ्नेश्वर कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. 

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पार्थिवावर सोमवारी (दि.२३) सकाळी ११:०० वाजता येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हास्याला नृत्याचा छंद होता, अभ्यासातही ती हुशार होती. 




Post a Comment

0 Comments