राजुरा नगर परिषद द्वारा स्वच्छता सेवा पंधरवडा अभियान उपक्रम




राजुरा नगर परिषद द्वारा स्वच्छता सेवा पंधरवडा अभियान उपक्रम


राजूरा ( राज्य रिपोर्टर न्युज ) राकेश कलेगुरवार प्रतिनिधी  : स्वच्छता ही सेवा पंधरवाडा २०२४" अंतर्गत या वर्षी स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता हे अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 02 आक्टोंबर दरम्यान राजुरा शहरात राबविण्यात येत असुन दिनांक 23/09/2024 रोजी मा.सूरज जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश मंदिर, देशपांडे वाडी  व हनुमान मंदिर भडकाम येथील परिसरात स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता अभियान  राबऊन सदर परिसर साफ करण्यात आले आणि स्वच्छता शपथ घेण्यात आली. 

सदर मोहिम यशस्वी करण्याकरिता नगर परिषद चे सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी व सदर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात आले. सदर स्वच्छता अभियान यशस्वी झाल्यानंतर मा. सूरज जाधव मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी राजुरा शहरातील नागरिकांना सदर स्वच्छता अभियान मध्ये सहभाग होऊन सदर मोहिम यशस्वी करण्याकरिता आव्हान केले आहे.




Post a Comment

0 Comments