लायब्ररी इमारत व सिमेंट रस्ता बांधकाम चे भूमिपूजन संपन्न..

 





लायब्ररी इमारत व सिमेंट रस्ता बांधकाम चे भूमिपूजन संपन्न..

◾आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या उपस्थितीत उसेगाव येथे लायब्ररी इमारत व सिमेंट रस्ता बांधकाम चे भूमिपूजन संपन्न..

चिमूर  ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी  : आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते उसेगाव येथे आमदार निधीतुन ( निधी १५ लक्ष रू ) लायब्ररी इमारत व सिमेंट रस्ता चे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले.

उसेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत महिलांकडून औक्षवंत करीत स्वागत करण्यात आले. डॉ. श्यामजी हटवादे यांनी मार्गदर्शन केले.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी उसेगाव वासियांना मार्गदर्शन करीत सांगितले की शेतकरी आपल्या पायावर सक्षम करण्यासाठी भाजप ची सरकार कल्याण कारी निर्णय घेतले आहे. शेत पिकांना योग्य भाव मिळत आहे.

विरोधक सतत खोटे बोलत आहे.विरोधकांच्या खोट्या प्रचार पासून जनतेनी सावध राहण्याचे सांगितले. आमच्या वर येणारे संकट दूर कर असे सांगत गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजप जेष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे,ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे , भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, कमलाकर लोणकर, भाजप जिप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे,संजय गांधी निराधार समिती संजय नवघडे भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ ममता डुकरे तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे , माजी उपसभापती विलास कोराम तालुका महामंत्री प्रशांत चिडे सुधीर पोहनकर तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, युवा नेते समीर राचलवार,नितेश दोडके,अविनाश सोनवाने गजानन जाभूळे, प्रणय हनवते जगदीश जाभूळे नरेंद्र हजारे मनी रॉय महादेव कोकोडे सौ आशा मेश्राम उपस्थित होते.

तसेच भाजप बूथ अध्यक्ष गणेश कामडी, शिवचरण गायकवाड नितेश चाफले गंगाधर नन्नावरे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments