शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे,' शिक्षक दिन ' साजरा

 






शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे,' शिक्षक दिन ' साजरा

चंद्रपुर  ( राज्य रिपोर्टर न्युज ) : स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. विधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात एक उत्कृष्ट तत्वज्ञानी, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते आणि त्यांची जयंती दरवर्षी शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते असे उपस्थिताना सांगितले. 

या दिवसाचे औचित्य साधून विधी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी स्वयम शासन राबवून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. एल. एल. बी अंतिम वर्षां चे विद्यार्थी  गायत्री उरकुडे आणि ऐजाज खान यांनी प्राचार्य व्ही उप प्राचार्य म्हणून आज महाविद्यालयात स्वयम शासन राबविले. या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले विद्यार्थी इमास शेख, ऐजाज खान, गौरी चौधरी व स्नेहल या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या शुभ हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रा. से. यो कार्यक्रम अधिकारी डॉ. सरोज कुमार दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला विधी महाविद्यालय तील पदवीत्तर विभाग प्रमुख डॉ. पंकज काकडे, एल. एल. बी अभ्यास क्रमाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभय बुटले, प्रा. डॉ. मनीषा आवळे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

 या कार्यक्रमात उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एल. एल. बी अंतिम वर्षा च्या विद्यार्थी यांनी केले. सर्व प्राध्यापक वृंद व प्राचार्य यांना सन्मान चिन्ह प्रदान करून विद्यार्थ्यानी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी विध्यार्थायनी लघु नाटिका सादर केली व कु श्रेया गोरानटीवर या विद्यार्थिनीने गीत सादर केले.




Post a Comment

0 Comments