रविवारी चंद्रपुरात संविधान सन्मान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा

 




रविवारी चंद्रपुरात संविधान सन्मान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा

◾भारतीय संविधानाबाबत जनजागृती व नितिमत्ता निर्माण करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने "संविधान सन्मान महोत्सव" 

◾मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मा. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. खासदार राकेश सिन्हा, मा. खासदार, श्रीमती. प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती..

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय संविधानाबाबत जनजागृती व नितिमत्ता निर्माण करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने "संविधान सन्मान महोत्सव" साजरा करण्यात येत आहे.

सदर महोत्सवाचा उद्घाटन समारंभ रविवार दि. २२ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रिर्यार्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे सायं ०४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे हे राहणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन मा. ना. रामदास आठवले, मा. केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारीता, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री चंद्रपूर, वर्धा जिल्हा हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. राकेश सिन्हा, मा. राज्यसभा सदस्य, नवी दिल्ली व श्रीमती प्रतिभा धानोरकर, मा. खासदार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघ हे उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे मा.प्र.कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर महोत्सवाचे नियोजन विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण व संविधान सन्मान महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या महोत्सवांतर्गत, संविधानाच्या जनजागृती संदर्भात गोंडवाना विद्यापीठातील अधिनस्त महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. हा महोत्सव २६ जानेवारी २०२५ पर्यंत साजरा करण्यात येणार असून विद्यापीठ स्तरावर दोन दिवसीय संविधान साहित्य सम्मेलन तसेच समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिसभा सदस्य संजय रामगिरवार, अधिसभा सदस्य डॉ. शिला नरवाडे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, अधिसभा सदस्य डॉ. मिलिंद भगत, अधिसभा सदस्य निलेश बेलखेडे.अधिसभा सदस्य डॉ. दिलीप चौधरी हे देखील उपस्थित होते. 

गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या संविधान सन्मान महोत्सव उद्घाटन कार्यक्रमासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.




Post a Comment

0 Comments