चिमूर तालूक्याती मौजा मांगलगाव येथील गणपत भोंदे यांचा सर्पदंशाने मृत्य

 



चिमूर तालूक्याती मौजा मांगलगाव येथील गणपत भोंदे यांचा सर्पदंशाने मृत्य

चिमुर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) , शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर तालूक्याती मौजा मांगलगाव येथील गणपत भोंदे वय अंदाजे ३६ वर्ष दिनांक २६ सप्टेंबर ला स्वतःच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक सर्पदंश झाल्याचे कळताच शेतामधून स्वबळाच्या हिम्मतीने दुचाकी वाहानाने जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन प्रथम उपचार करून उपजिल्हा रूग्णालय चिमुरला हलवण्यात आले. 

त्यांनतर उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयातच त्यांचा मृत्य झाल्याने परीवाराव दुःखाचे डोंगर कोसळले असून साप शुध्दा वन्य प्राण्यामध्ये येत असल्याने ज्या प्रमाणे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीना वनविभागा कडून मदत दिली जाते त्याच प्रमाणे सापाच्या चावा मुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीला शुध्दा त्याचप्रमाणे आर्थिक मदत वनविभा यांचेकडून देण्यात यावी.अश्या प्रकारची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.




Post a Comment

0 Comments