लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार - आ. किशोर जोरगेवार

 




लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार - आ. किशोर जोरगेवार 

◾माता भक्त आणि विश्वस्तांची नियोजन बैठक संपन्न, 7 ऑक्टोबरपासून पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : यंदा ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची तयारी आपण सुरू केली असून महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. या महोत्सवात लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  ऑक्टोबरपासून चंद्रपूरात सुरू होणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सव सिजन च्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने माता भक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार जोरगेवार बोलत होते. या बैठकीला श्री महाकाली माता ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल महाकालेसचिव अजय जयस्वालकोषाध्यक्ष पवन सराफविस्वत श्याम धोपटेमधुसुदन रुंगठावंदना हातगावकरडाॅ. अशोक वासलवारराजु शास्त्रकारडाॅ. जयश्री कापसे - गावंडेमनिषा पडगीलवारशैलेंद्र शुक्लागोपाल मंुदडादादाजी नंदनवारपुरुषोत्तम राउत, इतर मान्यवरांची  प्रामुख्यतेने उपस्थिती होती.

  श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरची ओळख बनला आहे. या महोत्सवामुळे चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव दरवर्षी नवनवे विक्रम करत असून यंदा राज्यस्थानी रथात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेचपाच दिवस धर्मिकसामाजिकसांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. या पाच दिवसांत जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

  दरम्यानसदर महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांच्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता भक्तांनी दिलेल्या सूचना लक्षात घेण्यात आल्या. यातील आवश्यक सूचनांची दखल घेण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात 9,999 कन्यांचे कन्याभूजन व कन्याभोजन करण्यात येणार आहे. तसेच नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात येणार आहे. या भव्य आयोजनात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला माता भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments